Maha Yojana Doot Registration | महा योजना दूत नोंदणी

Maha Yojana Doot Registration : नमस्कार मित्रांनो , या लेखामध्ये आपण महा योजना दूत योजना काय आहे ? कुणासाठी आहे ? त्याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा ? याची सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत .

मुख्यमंत्री महा योजना दूत योजना माहिती | महा योजना दूत नोंदणी कशी करायची याची सविस्तर माहिती येथे तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

महाराष्ट्र शासन हे आपल्या राज्यातील तरुण होतकरू मुला-मुलींसाठी एक सुवर्णसंधि घेवून आले आहे . यामध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतेक ग्रामपंचायत मध्ये एक “योजना दूत” हा नेमण्यात येणार आहे. या साठी नवीन नोंदणी ही सुरू करण्यात आली आहे. त्याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे.

महा योजना दूत

योजना नाव महा योजना दूत
राज्य महाराष्ट्र
कोणी सुरू केली मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लाभ १०,०००/महिना
अंतिम दिनांक

महा योजना दूत माहिती

महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यातील प्रतेक गावामध्ये एक योजना दूत नेमणार आहे . जे लोक निवडले जातील त्यांना महिन्याला १० हजार रुपयाचे मानधन हे देण्यात येणार आहे . यामध्ये योजना दूत यांना सर्व सरकारी योजणाची माहिती ही प्रतेक माणसांपर्यंत पोहचवण्याचे काम हे करायचे आहे .

तर जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्की नवीन योजना दूत नोंदणी ही करायची आहे. नवीन योजना दूत नोंदणी करण्यासाठी तुमचे वय १८ ते ३५ वर्ष दरम्यान असले पाहिजे . व तुमच्याकडे पदवी असावी .सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे .

उमेदवार निवडीचे निकष व फायदे

महा योजना दूत म्हणून नोंदणी करण्यासाठी तुम्हाला खालील पात्रता पूर्ण करावी लागेल .

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा .
  • शिक्षण : पदवी धारक असावा .
  • वय :- 18 ते ३५ वर्ष वय असावे.
  • उमेदवार यांच्याकडे मोबाइल क्रमांक असावा .
  • आधार कार्ड सोबत मोबाइल नंबर लिंक असावा.
  • राष्ट्रीयकृत बँक मध्ये खाते असावे व आधार लिंक पाहिजे .

वरील पात्रता तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे.

योजना दूत नोंदणी अशी करा .

नवीन योजना दूत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे पेक्षा करायचे आहेत. सर्वात आधी ऑफिसिअल वेबसाईट वरती यायचे आहे त्याची लिंक तुम्हाला वरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. खालील प्रमाणे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट दिसणार आहे.

त्यानंतर तुम्हाला नोंदणी या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला नवीन योजना दूत रजिस्ट्रेशन करायचे आहे. नोंदणी वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे स्क्रीन दिसणार आहे. येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला व्हेरिफाय ऑप्शन वरती क्लिक करून तुमचे आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे.

Verify ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे स्क्रीन ही दिसणार आहे. येथे तुम्हाला रोबोट नसल्याची टिक करायचे आहे व व्हेरिफिकेशन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला गेट ओटीपी या ऑप्शन वर क्लिक करून ओटीपी मिळवायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला खालील चित्रामध्ये दिसत असल्याप्रमाणे ओटीपी टाकण्याचा ऑप्शन हा उपलब्ध झालेला असेल. येथे तुम्ही ओटीपी टाकून सबमिट करायचा आहे.

otp व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल खालील प्रमाणे भरायचे आहे.

तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्हाला तुमची प्रोफाइल ही कम्प्लीट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला लॉगिन करून तुम्हाला अर्ज करायला सुरुवात करायची आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे पदवीचे प्रमाणपत्र हे अपलोड करायचे आहे. हे प्रमाणपत्र तुम्ही पीडीएफ स्वरूपात स्कॅन करून ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या गावांमध्ये ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत ते गाव निवडायचे आहे व तुमचा अर्ज हा सबमिट करायचा आहे.

या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही जवळच्या तहसील कार्यालयामध्ये भेट देऊ शकता. खाली कमेंट करून तुमचे प्रश्न हे विचारू शकता. अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही कॉन्टॅक्ट करा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न